Wednesday, September 23, 2020

लालपरी

 चार पाच महिन्यानंतर दिसतं होती ती..  तिला बघितलं आणि क्षणभर विचार आला येतील का ते दिवस परत?....  स्टॅन्डवर गाडी लागताच लोकांची जागा भेटण्यासाठीची तगमग, काही महाभागांसाठी तर खिडकीचं दरवाजा असायची की काय कुणास ठाऊक?  रुमाल टाकुन जागा पकडायची बघून शिकले खरी पण तसं करायला मात्र कधी जमलं नाही. गाडीतली वाढणारी गर्दी आणि रेलचेल बघुन कंडक्टरचं *माघून रिकामी गाडी आहे नंतर लगेच* हे अंतिम सत्य. दोन लोकांच्या सीटवर तिसऱ्याला जागा भेटते का त्यासाठी चाललेली धडपड.


वयस्कर लोकांचा जागेसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आणि भेटलीच तर *बाळा तुझं चांगलं होवो *आणि नाही भेटली तर *काय ही आजकालची पिढी*.  काही तरुणांना आपल्याला शेजारी कोणी सुंदर सोबती भेटते का ती वाट. प्रेमात सांगून पण जागा नाही भेटल्यावर *आम्ही पण तिकीट काढलंय सरका गुमानं* म्हणणारे काही लोकं. काहींच्या उलट्यांनी खराब झालेली एखादी रिकामी जागा. काही चळलेल्या लोकांना कुठे काही नालायकपणा करता येतो का ते वेगळंच. एवढ्या सगळ्यात कंडक्टरची *तिकीट तिकीट* साठीची एकतार.  *उरलेले सुट्टे उतरताना देतो* हे पण कटू सत्यचं. *अमुक अमुक गावं आलं की सांगाल का?* मी नवीन आहे वाले पण बरेचं. मध्येच खड्यात गाडी आदळल्यावर कुणाच्यातरी डोक्यात पडणारी एखादी बॅग. काहींच्या गाणी ऐकताना कुणाच्या तरी आठवणीत डोळ्यात आलेलं पाणी. प्रवासी लोकांची शाब्दिक भांडणं ....  आणि अजुन बरंच काही........... 

लालपरी

  चार पाच महिन्यानंतर दिसतं होती ती..  तिला बघितलं आणि क्षणभर विचार आला येतील का ते दिवस परत?....  स्टॅन्डवर गाडी लागताच लोकांची जागा भेटण्य...